अ‍ॅपशहर

पाच कारखाने अतिधोकादायक

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेला स्फोट आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर या कंपन्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना या परिसरात केवळ ५ कंपन्या अतिधोकादायक असल्याचे सुरक्षा संचनालयाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Times 24 Jul 2016, 4:00 am
कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 companies are dangerous in dombivali midc
पाच कारखाने अतिधोकादायक


म. टा. वृत्तसेवा, कल्याण

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेला स्फोट आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर या कंपन्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना या परिसरात केवळ ५ कंपन्या अतिधोकादायक असल्याचे सुरक्षा संचनालयाने स्पष्ट केले आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपन्या धोकादायक असल्याने हे कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी होत असून उद्योगमंत्र्यांनीही या कंपन्या स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या जवळपास १६०० कंपन्यापैकी ५०० पेक्षा जास्त कंपन्या रासायनिक उत्पादन घेतात. तर सुरक्षा संचनालयाकडे ४३७ कंपन्या नोंदणीकृत आहेत. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात यातील केवळ ५ कंपन्या अतिधोकादायक गटात मोडत असल्याचे सुरक्षा संचनालयाने स्पष्ट केले असून यात औचटेल प्रोडक्ट लिमिटेड, गणेश पॉलिकेम, मेट्रोपॉलिटन ऐक्सीम, क्वालिटी इंडस्ट्रीज आणि घर्डा केमिकल या पाच कंपन्यांमध्ये घातक केमिकल हाताळले जात असून यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र इतर कंपन्या या केवळ धोकादायक गटात मोडत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात सुरक्षा संचनालयाकडून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज