अ‍ॅपशहर

डहाणू लोकलमधील ग्रूपवर RPFचा लाठीमार

विरारच्या प्रवाशांना उतरू न देणाऱ्या डहाणू लोकलमधील एका ग्रूपवर रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. हा लाठीमार राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप डहाणूच्या प्रवाशांनी केला आहे.

Maharashtra Times 20 Oct 2016, 9:14 am
मटा ऑनलाइन वृत्त । विरार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a group in dahanu local train beaten up by rpf police
डहाणू लोकलमधील ग्रूपवर RPFचा लाठीमार


विरारच्या प्रवाशांना उतरू न देणाऱ्या डहाणू लोकलमधील एका ग्रूपवर रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. हा लाठीमार राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप डहाणूच्या प्रवाशांनी केला आहे.

चर्चगेटहून ८.२७ वाजता सुटणारी डहाणू लोकल रात्री १०.३०च्या सुमारास विरार स्टेशनात पोहोचली, तेव्हा आरपीएफच्या पोलिसांनी ट्रेनमध्ये चढून काही प्रवाशांना मारहाण केली. चेन खेचणे, रेल्वेत दादागिरी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे आरोप १४ प्रवाशांवर ठेवण्यात आले आहेत.

मुंबई सेंट्रल, दादरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारचे बरेच नोकरदार प्रवास करतात. त्याचा त्रास डहाणूपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना सोसावा लागतो. त्याची 'शिक्षा' म्हणून डहाणूच्या एका ग्रूपनं विरारच्या प्रवाशांना उतरूच दिलं नव्हतं. ते त्यांना वैतरणापर्यंत घेऊन गेले होते. या संदर्भात विरारच्या संबंधित प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर आरपीएफनं ही कारवाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज