कल्याण : एक शहर, एक जयंती, एक मिरवणूक अशी संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून राबविली जाणार आहे. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अजय सावंत यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिलपासून शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिलला ल्युर्डस हायस्कूल येथे सकाळी ८ ते १० यावेळेत चित्रकला स्पर्धा, १२ एप्रिल आंबिवली पूर्व मोहने येथे आरोग्य शिबीर, १३ एप्रिलला कल्याण पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि १४ एप्रिलला वायलेनगर येथे भीम पहाट आयोजित करण्यात येणार आहे.