अ‍ॅपशहर

ठाणे स्थानकात लिफ्टची सोय

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पणम टा...

Maharashtra Times 21 Jul 2018, 4:00 am

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सरकत्या जिन्यांच्या सोबतीने लिफ्टची सेवाही कार्यान्वित करण्यात येत असून शनिवारी तीन लिफ्टचे लोकार्पण केले जाणार आहे. प्लॅटफॉर्म दोन, तीन आणि पाचवरील लिफ्टचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यामुळे नागरिकांना पुलावर चढणे आणि उतरण्यासाठीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. नव्या पादचारी पुलांवर चढण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी त्याला लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सरकते जिने सुरू केल्यानंतर त्याचा फायदा लाखो प्रवासी घेत असताना आता स्थानकामध्ये लिफ्ट सुरू करण्यात येणार आहे. सरकत्या जिन्यांचा वापर सर्व वयोगटातील व्यक्तींकडून केला जात असला तरी ज्येष्ठ आणि महिला या जिन्यांचा वापर करताना काहीशा घाबरत होत्या. लिफ्टमुळे त्यांना प्रवास करणे सोयीचे ठरू शकणार आहे. अवजड सामानासह प्लॅटफॉर्मवरून पादचारी पुलांवर चढणाऱ्या नागरिकांची यामुळे सोय होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज