अ‍ॅपशहर

टिटवाळा-सीएटी लोकलमध्ये मिरचीपूड फेकली

मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सीएसटीला जाणारी टिटवाळा-सीएसटी लोकल उभी असताना एका अज्ञात व्यक्तीने गाडीच्या खिडकीत मिरचीपूड फेकल्याची घटना घडली. मिरचीपूड फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीतील जागेच्या भांडणामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. ही घटना संध्याकाळी ७.३०च्या सुमाराला घडली.

Maharashtra Times 20 Jun 2017, 11:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a man throws pepperpowder on passangers of titwalla cst local on shahad railway station
टिटवाळा-सीएटी लोकलमध्ये मिरचीपूड फेकली

मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सीएसटीला जाणारी टिटवाळा-सीएसटी लोकल उभी असताना एका अज्ञात व्यक्तीने गाडीच्या खिडकीत मिरचीपूड फेकल्याची घटना घडली. मिरचीपूड फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडीतील जागेच्या भांडणामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. ही घटना संध्याकाळी ७.३०च्या सुमाराला घडली.

मिरचीपूड अंगावर आणि डोळ्यात गेल्याने एकूण ७ प्रवाशांचे डोळे आणि त्वचेला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्या प्रवाशांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर या प्रवाशांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, कसारा आरपीएफने शहाड स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेज मिळवून ते स्टेशनबाहेरील फेरीवाले आणि दुकानदारांना दाखवले. त्यानंतर मिरचीपूड फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. त्या व्यक्तीचा पत्ता शोधून पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज