अ‍ॅपशहर

लाचखोर एजंट एसीबीच्या जाळ्यात

ड्रायव्हिंग लायसन्स ट्रान्सफर करण्यासाठी तसेच तेथील पत्ता बदलण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा ठाणे आरटीओ कार्यालय येथील खासगी एजंट शाहिद जामलुद्दीन शेख (२९) याला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 3:00 am
ठाणे : ड्रायव्हिंग लायसन्स ट्रान्सफर करण्यासाठी तसेच तेथील पत्ता बदलण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा ठाणे आरटीओ कार्यालय येथील खासगी एजंट शाहिद जामलुद्दीन शेख (२९) याला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम acb arrest agent
लाचखोर एजंट एसीबीच्या जाळ्यात


आरटीओमधील विविध कामांना लागणारा वेळ लक्षात घेऊन ग्राहक एजंटकडे धाव घेतात. मात्र त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशाच एका प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उप अधीक्षक दीपक दळवी तपास करत आहेत. परंतु ठाणे आरटीओ कार्यालयात अद्यापही खाजगी एजंटचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज