मुंबई-नाशिक रस्त्यावरील साकेत पुलाजवळ टेम्पोच्या झालेल्या अपघातात चालक रामनारायण जैस्वार आणि क्लीनर अमित जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघेही टेम्पोत अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेत जखमींना टेम्पोतून बाहेर काढत त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. झेरॉक्स पेपरचे बॉक्स घेऊन हा टेम्पो भिवंडीतून येत होता. मात्र अपघात घडला, त्यावेळी टेम्पो क्लीनर चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे. क्लीनरचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
टेम्पोचा अपघात
मुंबई-नाशिक रस्त्यावरील साकेत पुलाजवळ टेम्पोच्या झालेल्या अपघातात चालक रामनारायण जैस्वार आणि क्लीनर अमित जखमी झाले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 4:00 am