अ‍ॅपशहर

हत्येतील आरोपीला ८ वर्षांनंतर अटक

बदलापूर येथील एका बांधकामाच्या वादातून बांधकाम व्यावसायिक बलराज मुलचंदानी यांच्या हत्येतील ८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अमजद याला उल्हासनगर गुन्ह अन्वेषण पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

Maharashtra Times 17 Nov 2017, 12:54 am
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accused arrested after 8 years
हत्येतील आरोपीला ८ वर्षांनंतर अटक


बदलापूर येथील एका बांधकामाच्या वादातून बांधकाम व्यावसायिक बलराज मुलचंदानी यांच्या हत्येतील ८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अमजद याला उल्हासनगर गुन्ह अन्वेषण पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

उल्हासनगर येथे राहणारे आणि बांधकामाचा व्यवसाय असलेले बलराम टिकमचंद मूलचंदानी (५१) यांची २१ जानेवारी २००९ रोजी दोन दुकानांच्या गाळ्यांच्या वादातून ह्त्या करण्यात आली होती. या गाळ्यांच्या वादावर चर्चा करण्यासाठी संभाजी पवार याने मूलचंदानीला बदलापूर येथील फार्महाऊसवर बोलावले होते. मात्र चर्चा फिस्कटल्याने संभाजी पवार, कपिलदेव मंडल, फुलराम चौधरी, आणि अमजद शहा यांनी मूलचंदानी यांचे अपहरण करून हत्या केली. नंतर पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने मूलचंदानी यांचा मृतदेह पनवेल तालुक्यातील वाकोडी गावातील जंगलात टाकून दिला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संभाजी पवार, कपिल मंडल, फुलराम चौधरी यांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती. चौथा आरोपी अमजद शहा ८ वर्षांपासून फरार होता. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तीसगाव येथे तो नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळताच गुन्हा अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बागलकोट, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, गणेश तोरमल, रामसिंग चव्हाण, पोलिस हवालदार भरत नवले, मोरेश्वर बाबरे, जावेद मुलानी, गणेश गुरमाळी यांच्या पथकाने अमजद शहा उर्फ साहिल खान याला अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज