अ‍ॅपशहर

वाड्यात फेरीवाल्यांवर कारवाई; रस्ते मोकळे

वाड्यातील रस्ते फेरीवालेमुक्त करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. कायमस्वरूपी अशा रस्त्यांची गरज व्यक्त करून, त्यासाठी बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

Maharashtra Times 12 Dec 2017, 4:09 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action against the hawkers roads are free
वाड्यात फेरीवाल्यांवर कारवाई; रस्ते मोकळे


वाड्यातील रस्ते फेरीवालेमुक्त करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. कायमस्वरूपी अशा रस्त्यांची गरज व्यक्त करून, त्यासाठी बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.

वाडा शहराला विविध नागरी समस्या भेडसावत असून, मुख्य रस्त्यावरील फेरीवाले व भाजीविक्रेते ही यातीलच एक प्रमुख समस्या आहे. वाडा शहरातील खंडेश्वरीनाका ते परळीनाका या मुख्य रस्त्यावर त्यांचा विळखा असतो. त्यामुळे नागरिकांना पार्किंग समस्या व वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाडा पोलिसांनी कारवाई करत हा मार्ग मोकळा केला.

...

कारवाईमागे राजकारण

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी अशीच धडक कारवाई केली होती. त्यावेळी ग्रामपंचायतीने हात वर केले होते. आता निवडणूक तोंडावर आल्याने निव्वळ दिखावा म्हणून पोलिस बळाचा वापर करून ही बेगडी कारवाई करण्यात आल्याचे काही विक्रेते आणि नागरिकांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज