अ‍ॅपशहर

टीएमटी जाहिरातीत घोटाळा

तीन वर्षांपूर्वीची निविदा पुनरूज्जीवित करून कंत्राटदाराला मुंब्र्यातील पाणीपुरवठा योजनेचे काम देण्याचा प्रयत्न अंगलट येऊ लागल्यानंतर प्रशासनाने तो प्रस्ताव गुरुवारी मागे घेतला. मात्र, याच सभेत टीएमटीवरील जाहिरातीचे दोन वर्षांपूर्वीचे काम कंत्राटदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव तहकूब केला आहे. मात्र, असा वादग्रस्त प्रस्ताव मांडून प्रशासनाने आपल्या भूमिकेबद्दल पुन्हा संशय निर्माण केला आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:00 am
दोन वर्षांपूर्वीच्या निविदेसाठी प्रशासनची लगबग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम advertise scam in tmt
टीएमटी जाहिरातीत घोटाळा

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

तीन वर्षांपूर्वीची निविदा पुनरूज्जीवित करून कंत्राटदाराला मुंब्र्यातील पाणीपुरवठा योजनेचे काम देण्याचा प्रयत्न अंगलट येऊ लागल्यानंतर प्रशासनाने तो प्रस्ताव गुरुवारी मागे घेतला. मात्र, याच सभेत टीएमटीवरील जाहिरातीचे दोन वर्षांपूर्वीचे काम कंत्राटदाराला त्याच दरांमध्ये देण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव तहकूब केला आहे. मात्र, असा वादग्रस्त प्रस्ताव मांडून प्रशासनाने आपल्या भूमिकेबद्दल पुन्हा संशय निर्माण केला आहे.

१४ ऑगस्ट, २०१४ रोजी टीएमटीच्या २९३ बसवर जाहिरात प्रसिद्ध करण्याची निविदा पालिका प्रशासनाने जाहीर केली होती. मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ एकाच कंत्राटदाराने हे काम करण्यात स्वारस्य दाखविले होते. दरम्यानच्या काळात भाडेतत्त्वावर चालणाऱ्या २५ बस बंद झाल्या. त्यामुळे टीएमटीच्या ताफ्यातील २६८ बसवर जाहिरात करण्याचे काम मे. एक्सल अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग या कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या जाहिरातीपोटी पालिकेला तीन वर्षांत ५ कोटी ६४ लाख रुपये मिळणार होते. निविदेतील अंदाजे रकमेपेक्षा हा दर जास्त आहे, अन्य संस्थांमध्ये यापेक्षा कमी दरात काम केले जाते तसेच, २०१४ साली मंदी असल्यामुळे जास्त दर मिळणे अशक्य आहे, अशी कारणे देत प्रशासनाने एकमेव कंत्राटदारावर कृपाछत्र धरले होते. टीएमटीचा कारभार सांभाळण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यांच्या समितीने ही निविदा मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्याची शिफारस १७ डिसेंबर, २०१५ रोजी केली होती. मात्र, गेल्या २१ महिन्यांत त्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नव्हता.

नवी प्रक्रिया का नाही?

टीएमटीच्या ताफ्यात आता नव्या कोऱ्या बस दाखल होत असल्याने त्यावर जाहिरात करून चांगला नफा कमावता येईल या उद्देशाने २१ महिन्यांपूर्वीच्या शिफारसीचा आधार घेत मंजुरीचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. मुल्ला यांनी त्याला आक्षेप नोंदवत ही निविदा प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप केला. वास्तविक निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ९० दिवसांत कामाची वर्क ऑर्डर दिली नाही तर ती प्रक्रिया रद्द होते. नियमानुसार जुनी निविदा रद्द करून पालिकेने या कमासाठी नव्याने जाहिरात काढणे अपेक्षित होते. तसे केले असते तर टीएमटीला वाढीव महसूलही मिळाला असता. मात्र तसे न करता पालिकेने दोन वर्षांपूर्वीच्याच दरात आणि त्याच कंत्राटदाराला काम देण्यामागचे कारण काय असा सवाल मुल्ला यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाने प्रशासनाचा हा प्रस्ताव तहकूब केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज