अ‍ॅपशहर

ठाण्यात पुन्हा इफेड्रिन कनेक्शन!

एमडी पावडर आणि इफेड्रिन या अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी ठाण्यात आलेल्या तिघा नायजेरियन नागरिकांना ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. ठाण्याच्या तलावपाळीसमोरील शिवाजी मैदानासमोरून तिघा आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पोलिसांना २६० ग्रॅम एमडी पावडर आणि ३२० ग्रॅम इफेड्रिन सापडले.

Maharashtra Times 5 Dec 2016, 3:00 am
एमडी आणि इफेड्रिनसह तिघे नायजेरीयन अटकेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम again ephedrine connection in thane
ठाण्यात पुन्हा इफेड्रिन कनेक्शन!


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

एमडी पावडर आणि इफेड्रिन या अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी ठाण्यात आलेल्या तिघा नायजेरियन नागरिकांना ठाणेनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. ठाण्याच्या तलावपाळीसमोरील शिवाजी मैदानासमोरून तिघा आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पोलिसांना २६० ग्रॅम एमडी पावडर आणि ३२० ग्रॅम इफेड्रिन सापडले.

यावर्षीच्या १० एप्रिलला ओकाय सिप्रेन चिन्नासा या नायजेरियन तरुणाला अर्धा किलो इफेड्रिन ड्रग्जसह कल्याण गुन्हे शाखेने पकडले होते. त्यानंतर ठाण्यातील वर्तकनगर भागातून दोन किलो इफेड्रिन ड्रग्ज पावडरसह दोघांच्या अटकेनंतर थेट सोलापुरात पोहचलेल्या ठाणे पोलिसांनी दोन हजार कोटींचे इफेड्रिन पकडले होते. या प्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पुढील तपासासाठी हा गुन्हा ठाणे अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

जस्टीन इगबोनाको जॉय (२८), युगो चुकूआ अजाह (३२) आणि सुलेमोन ओकीक इकेनिचिकोह (२६) यांना ठाणेनगर पोलिस आणि ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या संयुक्त पथकाने अटक केली. अटकेतील तिन्ही आरोपी तलावपाळी परिसरात एमडी पावडर आणि इफेड्रिन विक्रीसाठी आले होते. मूळचे नायजेरियाचे रहिवासी असलेले हे तिन्ही आरोपी नालासोपारा परिसरात सध्या वास्तव्यास होते. या तिघांना न्यायालयाने ९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज