अ‍ॅपशहर

काळ्या पैशाच्या स्रोतांचा शोध घ्यायला हवा

सोन्याची मोठी खरेदी, जमिनीचे व्यवहार, घरे आदी मालमत्ता खरेदी, उद्योग-व्यवसायांतील कर बुडविण्याची प्रवृत्ती यामुळेच काळ्या पैशाची निर्मिती वाढली. जागतिकीकरण, उदारीकरणामुळेच काळे धन जमविण्यास प्रोत्साहन मिळाले.

Maharashtra Times 26 Dec 2016, 12:37 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit abhyankar slams note ban decision
काळ्या पैशाच्या स्रोतांचा शोध घ्यायला हवा


सोन्याची मोठी खरेदी, जमिनीचे व्यवहार, घरे आदी मालमत्ता खरेदी, उद्योग-व्यवसायांतील कर बुडविण्याची प्रवृत्ती यामुळेच काळ्या पैशाची निर्मिती वाढली. जागतिकीकरण, उदारीकरणामुळेच काळे धन जमविण्यास प्रोत्साहन मिळाले. अशा काळ्या उत्पन्नाच्या मार्गाचा शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ आणि सीपीएम नेते अजित अभ्यंकर यांनी केले. नोटाबंदीचा निर्णय तत्त्वत: योग्य असला, तरी पूर्वतयारी केली नसल्याने हा हुकूमशाही निर्णय ठरला आहे, यात संवेदनशीलतेचा अभाव आहे, असे परखड मतही त्यांनी नोंदवले.

विरारजवळील नंदाखाल येथे निर्भय जन संस्थेने अभ्यंकर ‘चलनबंदी व काळा पैसा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी फादर मायकल जी हे होते. निर्भयचे संस्थापक अध्यक्ष मनवेल तुस्कानो यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४० टक्के करबुडीत काळा पैसा आहे. सोन्याच्या हौसेपायी देशात ९५० टन सोन्याची आयात होते. यातील बहुतांश खरेदी रोखीने होत असल्याने कर बुडवण्याचे प्रमाण वाढले.

३१ डिसेंबरनंतर नागरिकांनी आपला लोकशाही हक्क बजावून काळा पैसा किती शोधला, याची माहिती सरकारकडून घ्यावी. देशात १४.५ लाख कोटींच्या नोटा रद्द करण्यात आल्या. बँकांची नोटा तपासण्याची यंत्रणा सदोष असल्याने रिझर्व्ह बँकेकडे १४.५ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून बँकेत भरलेले पैसे नेमके कोणाचे होते, याचा शोध घेतला पाहिजे, असे अभ्यंकर म्हणाले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, विजय मल्ल्याला कर्जमाफी मिळते, आता तर राजकीय पक्षांना सूट देण्याचे ठरले आहे, हे अत्यंत संतापजनक असल्याची टीका त्यांनी केली.

या निर्णयानंतर सोनेखरेदी केलेल्या ग्राहकांचे व्यवहार तपासावेत, सराफांचे कॅश बुक, ऑर्डर बुक, स्टॉक बुक यांची तपासणी व्हायला हवी होती. दोन हजाराची नोट छापणे पूर्णतः चुकीचे आहे. यामुळे लोकांच्या हालात आणखी वाढ झाली, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जॉन परेरा यांनी केले, तर सूत्रसंचालन नितीन डिमेलो यांनी केले. आभार प्रदर्शन शर्ली लिओ मच्याडो यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज