अ‍ॅपशहर

साडेतीन लाखांची लूट

स्वयंपाकाची कामे करणाऱ्या एका मोलकरणीच्या घरात साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना अंबरनाथ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बनावट चावीने घराचे दार उघडून आत शिरलेल्या चोराने तिजोरीसुद्धा बनावट चावीनेच उघडली आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra Times 27 Jun 2016, 3:00 am
ठाणे : स्वयंपाकाची कामे करणाऱ्या एका मोलकरणीच्या घरात साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना अंबरनाथ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बनावट चावीने घराचे दार उघडून आत शिरलेल्या चोराने तिजोरीसुद्धा बनावट चावीनेच उघडली आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambarnath 3 5 lakh looted
साडेतीन लाखांची लूट


अंबरनाथ येथील विठ्ठल मंदिराजवळच्या गौतम चाळीत ही मोलकरीण राहते. शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ती घरी परतली, तेव्हा कपाटाची तिजोरी उघडी असल्याचे तिला आढळले. चोरांनी तिजोरीतील ७० हजारांचे मंगळसूत्र, ५५ हजार रुपये किमतीचे दोन नेकलेस, ४० हजार रुपयांच्या चार अंगठ्या, ब्रेसलेट, सोन साखळी, कर्णफुले आणि ७० हजार रुपये रोख असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज