अ‍ॅपशहर

​ अर्नाळ्यात स्वच्छता मोहिमेचे शतक

विरारजवळील अर्नाळा गावात ‘मी जागृत बंदरपाडेकर स्वच्छता अभियान’ गेले दोन वर्षे राबवले जात आहे. रविवारी या अभियानाने शंभरावी स्वच्छता मोहीम पूर्ण केली. गाव स्वच्छ राहावे म्हणून गावातील तरुण एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवतात.

Maharashtra Times 13 Dec 2017, 4:01 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arnala cleanliness drive
​ अर्नाळ्यात स्वच्छता मोहिमेचे शतक


विरारजवळील अर्नाळा गावात ‘मी जागृत बंदरपाडेकर स्वच्छता अभियान’ गेले दोन वर्षे राबवले जात आहे. रविवारी या अभियानाने शंभरावी स्वच्छता मोहीम पूर्ण केली. गाव स्वच्छ राहावे म्हणून गावातील तरुण एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवतात.

रविवारी झालेल्या मोहिमेत समुद्रावरील जेट्टी रोड, छत्रपती शिवाजी चौक, विठ्ठल मंदिर विभाग, जंजिरे अर्नाळाकडे जाणारा मुख्य रस्ता, वाचनालय विभाग तसेच गावातील छोटेमोठे गल्लीबोळ साफ करण्यात आले. या शतकपूर्ती स्वच्छता मोह‌मिेने अर्नाळा भागात एक आदर्श निर्माण केला आहे, असे उपस्थितांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेनंतर कचऱ्याची विल्हेवाट डम्प‌िंग ग्राउंड येथे लावण्यात आली.

गेल्या दोन वर्षात ‘मी जागृत बंदरपाडेकर’ अभियानाने स्वच्छता अभियानाबरोबरच वसईतील इतर सामाजिक कामांमध्येही सहभाग घेतला. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले वसई मोहीम परिवारासोबत गड कोटांवर संवर्धन मोह‌मिा, ऐतिहासिक अशा २७८व्या श्री वज्रेश्वरी पालखीचे आयोजन, अर्नाळा व वसई किल्ल्यात दारूबंदी मोह‌मिा, गडांचे पावित्र्य राखण्यासाठी सक्रिय सहभाग, नैसर्गिक आपतीच्यावेळी श्रमदान, स्वच्छतेविषयी प्रबोधनपर चित्रकला मोहीम, एखाद्या कुटुंबावर ओढावलेल्या दुर्धर प्रसंगी आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदत, समुद्रकिनारा स्वच्छता मोह‌मिा, खो-खो मैदानाचा कायापालट, क्रिकेट मैदानाचा स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून डागडुजीचे काम, आरोग्य शिबीर, वेळच्या वेळी गावात डासप्रतिबंधक धूर फवारणी, औषध फवारणी असे उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर सातत्याने स्वच्छता मोहीम घेऊन हा परिसर स्वछ ठेवण्याचा प्रयत्न ‘मी जागृत बंदरपाडेकर’ समूहातील तरुणांनी केला आहे. विविध चांगल्या पदावर काम करणारे तरुण, गावातील तरुण कार्यकर्ते असे सर्व मिळून हे काम करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज