अ‍ॅपशहर

रिक्षाचालकांची पुन्हा मुजोरी

रिक्षाचालकाची मुजोरी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागते. मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रिक्षाचालकांच्या याच अरेरावीचा फटका पुन्हा एकदा एसटीचालकाला बसला आहे. सोमवारी दुपारी कल्याण एसटी स्थानकात येणाऱ्या एसटीचालकाने गाडीच्या पुढे उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला रिक्षा पुढे घेण्यास सांगताच या मुजोर रिक्षाचालक सलीम अब्दुल्ला पठाण याने थेट एसटी चालकाच्या केबिनमध्ये शिरून चालक सुरेश भोसले या चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या हाताचा कडाडून चावा घेत भोसले यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत केली आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 4:00 am
कल्याणमध्ये एसटीचालकाला बेदम मारहाण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arrogant autodriver harrassed st driver
रिक्षाचालकांची पुन्हा मुजोरी

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

रिक्षाचालकाची मुजोरी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागते. मात्र, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रिक्षाचालकांच्या याच अरेरावीचा फटका पुन्हा एकदा एसटीचालकाला बसला आहे. सोमवारी दुपारी कल्याण एसटी स्थानकात येणाऱ्या एसटीचालकाने गाडीच्या पुढे उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला रिक्षा पुढे घेण्यास सांगताच या मुजोर रिक्षाचालक सलीम अब्दुल्ला पठाण याने थेट एसटी चालकाच्या केबिनमध्ये शिरून चालक सुरेश भोसले या चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या हाताचा कडाडून चावा घेत भोसले यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत केली आहे.

रिक्षाचालकाच्या या अरेरवारीविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडी एसटी स्थानकात रिक्षाला बसचा धक्का लागल्यामुळे बसचालक प्रभाकर गायकवाड यांना रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केली होती. दुपारी अलिबाग-कल्याण एसटी कल्याण आगारात प्रवेश करण्यासाठी येताच प्रवेशद्वारावरच पठाण या रिक्षाचालकाने रिक्षा उभी करून ठेवली होती. यामुळे बसचालक सुरेंद्र भोसले यांनी या रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगताच त्याने शिवीगाळ करत त्यांच्या बसच्या केबिनमध्ये शिरून त्यांना बेदम मारहाण केली. यात मारहाणीत त्यांचे कपडे फाटले. सन्नीच्या मारापासून वाचण्यासाठी भोसले यांनी आपला डावा हात पुढे करताच त्याने त्यांच्या अंगठ्याचा करकचून चावा घेतला. यामुळे भोसले यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी पठाणला अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज