अ‍ॅपशहर

आसनगाव हरित स्थानक

नैसर्गिक ऊर्जेचा वापर करण्यात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाची महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी हरित स्थानक म्हणून रविवारी घोषणा केली. मध्य रेल्वेचे आसनगाव स्थानक पहिले हरित स्थानक ठरले असून सौर ऊर्जा व विंड एनर्जी प्रकल्पाच्या १६.२ किलो वॅट वीज निर्मितीमुळे या स्थानकावरील वीज देयकात किमान ७० टक्के फायदा होणार आहे.

Maharashtra Times 5 Feb 2018, 12:31 am
शहापूर : नैसर्गिक ऊर्जेचा वापर करण्यात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाची महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी हरित स्थानक म्हणून रविवारी घोषणा केली. मध्य रेल्वेचे आसनगाव स्थानक पहिले हरित स्थानक ठरले असून सौर ऊर्जा व विंड एनर्जी प्रकल्पाच्या १६.२ किलो वॅट वीज निर्मितीमुळे या स्थानकावरील वीज देयकात किमान ७० टक्के फायदा होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asangaon


मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकावरील सौर ऊर्जेच्या युनिटचे उद्घाटन महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आसनगाव रेल्वे स्थानक हे हरित स्थानक झाल्याचे घोषित केले. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानक परिसरातील ७० ते ७५ गावांतील ७५ हजारांहून अधिक प्रवासी या स्थानकावरून दररोज प्रवास करतात. या स्थानकावर पाच कि. वॅटचे दोन सौर ऊर्जा युनिट तसेच ६.२ किलो वॅटचे पवनचक्की व सौर ऊर्जेचे एकत्र युनिट असे एकूण १६.२ किलो वॅट क्षमतेचे एकूण तीन युनिट बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ११ लाख खर्च आला असून यामुळे या स्थानकावरील कार्यालयातील विद्युत उपकरणांसह एलईडी दिवे, ऊर्जेची बचत करणारे सीलिंग फॅन, तिकीट खिडक्यांवरील कम्प्युटर सौरऊर्जेवर चालणार आहेत. यामुळे वीजदेयकात किमान ७० टक्के फायदा होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांसह रेल्वेचे अधिकारी तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव, अनिता झोपे, जगदीश धनगर व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज