अ‍ॅपशहर

आश्रमशाळेच्या इमारतीचे भिजत घोंगडे

वाडा तालुक्यातील गुंज येथील आश्रमशाळेच्या इमारतीचे भिजत घोंगडे अनेक वर्षांपासून तसेच पडले असून ही आश्रमशाळा पाली येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त स्थानिक, आदिवासी विकास विभागाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2019, 5:46 pm
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashram school building soaked huntsman
आश्रमशाळेच्या इमारतीचे भिजत घोंगडे


वाडा तालुक्यातील गुंज येथील आश्रमशाळेच्या इमारतीचे भिजत घोंगडे अनेक वर्षांपासून तसेच पडले असून ही आश्रमशाळा पाली येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त स्थानिक, आदिवासी विकास विभागाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या बुधावली - गुंज येथील आदिवासी आश्रमशाळेच्या वर्गखोल्या धोकादायक असल्याचे कारण पुढे करत प्रकल्प विभागाने ही आश्रमशाळा वाडा तालुक्यातील पाली येथे स्थलांतरित केली आहे.

या घटनेला तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटला. मात्र तरीही आश्रमशाळेच्या बांधकामाचा मुहूर्त सापडत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

वाडा तालुक्यातील मोठी बाजार पेरह व औधोगिक सात असलेल्या कुडूसपासून ९ किमी अंतरावर गर्द झाडीत गुंज हे गाव वसले आहे. गावाच्या मागच्या टेकडीवर भगवान परशुरामाचे मंदिर तर दुसऱ्या बाजूला भागीरथी मातेचे मंदिर आहे. अशा निसर्गाच्या सानिध्यात ही आश्रमशाळा भरत होती. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत ४०० विद्यार्थिनी तर २०० विद्यार्थी शिकत होते. शाळा स्थलांतरित केल्यानंतर पाली येथे केवळ ३९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर अन्य विद्यार्थ्यांनी के. जी. पाटील विद्यालय, देवघर व ह. वी. पाटील विद्यालय, चिंचघर येथे नावनोंदणी केली आहे. तर पहिली ते चौथीपर्यंतचे काही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षणच सोडून दिले आहे. त्यामुळे ही शाळा त्वरित सुरू करावी या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी गुंज येथील आश्रमशाळा त्वरित सुरू व्हावी. अन्यथा आम्हाला आमरण उपोषण आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.

मोहण पवार, सरपंच ग्रामपंचायत, गुंज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज