अ‍ॅपशहर

तो राजहंस एक…

त्यांनाही गाण्याची आवड आणि सुरांची जाण… मात्र शारीरिक तसेच बौद्धिक मर्यादांमुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी कलाविष्कार सादर करता येत नाही. काहींचा आवाज गोड, तर अनेकांचा ठेका उत्तम. त्यांच्यातील याच कलागुणांना राजहंस फाऊंडेशन या ऑटिझम विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने एकत्र आणले आणि चक्क त्यांचा एक आगळावेगळा बॅण्ड तयार झाला. त्यांचा हाच बॅण्ड शनिवार, २२ एप्रिल रोजी काशिनाथ घाणेकर येथे रसिकांसमोर येणार आहे.

Maharashtra Times 2 Apr 2017, 4:00 am
ऑटिझमग्रस्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा बॅण्ड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम autism students band
तो राजहंस एक…

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

त्यांनाही गाण्याची आवड आणि सुरांची जाण… मात्र शारीरिक तसेच बौद्धिक मर्यादांमुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी कलाविष्कार सादर करता येत नाही. काहींचा आवाज गोड, तर अनेकांचा ठेका उत्तम. त्यांच्यातील याच कलागुणांना राजहंस फाऊंडेशन या ऑटिझम विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने एकत्र आणले आणि चक्क त्यांचा एक आगळावेगळा बॅण्ड तयार झाला. त्यांचा हाच बॅण्ड शनिवार, २२ एप्रिल रोजी काशिनाथ घाणेकर येथे रसिकांसमोर येणार आहे.

टीव्हीवर गाणे लागले की लहान मुले नकळत ठेका धरतात. काहीजण त्यात सूर मिसळतात आणि कुटुंबीयांकडून त्यांचे तोंडभरून कौतुक होते. त्यांच्यातील याच कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पालकांकडून अनेक क्लासेस, कार्यशाळा यांच्याकडे धाव घेतली जाते. त्यातून अनेक बालकलाकार घडतात. मात्र ऑटिझम या आजाराने ग्रस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना बालपणापासून या कलांचा आनंद फारसा उपभोगता येत नाही. वेगळी शाळा आणि पालक एवढेच विश्व त्यांच्यासाठी मर्यादित असल्याने अशा कलांचे प्रशिक्षणही फारसे घेता येत नाही. मात्र राजहंस फाऊंडेशनतर्फे त्यांच्या या कलांना प्रोत्साहन देत ‘तो राजहंस एक’ हा त्यांचा आगळावेगळा कार्यक्रम तयार केला आहे.

२ एप्रिल रोजी असणाऱ्या ‘जागतिक ऑटिझम डे’च्या निमित्त्ताने हा कार्यक्रम होणार असला तरी तो २२ एप्रिल रोजी रसिकांसमोर सादर होणार आहे. यावेळी संस्थेत शिकणाऱ्या सर्व ऑटिझमग्रस्त मुलांचे कलाविष्कार सादर होणार असून त्यांचा खास बॅण्ड रसिकांचे मनोरंजन करणार आहे. त्याची जय्यत तयारी संस्थेतर्फे सुरू असल्याचे संचालिका मनिषा सिल्लम यांनी सांगितले. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हो कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी असेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांसह सुकुमार साखरदांडे यांचाही समूह सादरीकरणे करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज