अ‍ॅपशहर

ठाण्यातही आता पाळणाघर नोंदणी

खारघर येथील पाळणाघरात लहानग्याला क्रूर मारहाण झाल्यानंतर ठाणे शहरातील सर्व पाळणाघरांची नोंदणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. घराघरात चालणाऱ्या या बालसंगोपन केंद्रांची माहितीही पुढील आठ दिवसांत पालिकांना देण्याचे आदेश काढले जाणार असून त्यानंतर या केंद्रांमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालिका ठोस प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

Maharashtra Times 2 Dec 2016, 4:00 am
खारघरमधील भीषण घटनेनंतर प्रशासनाला जाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम baby seating needs registration
ठाण्यातही आता पाळणाघर नोंदणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

खारघर येथील पाळणाघरात लहानग्याला क्रूर मारहाण झाल्यानंतर ठाणे शहरातील सर्व पाळणाघरांची नोंदणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. घराघरात चालणाऱ्या या बालसंगोपन केंद्रांची माहितीही पुढील आठ दिवसांत पालिकांना देण्याचे आदेश काढले जाणार असून त्यानंतर या केंद्रांमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालिका ठोस प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

ठाणे शहरांतील जवळपास प्रत्येक सोसायटीत किमान एक तरी पाळणाघर चालविले जाते. या पाळणाघरांची कुठेही नोंदणी केली जात नाही. त्यामुळे शहरात किती आणि कुठे पाळणाघरे आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती कुठवल्याही सरकारी कार्यालयात मिळू शकत नाही. खारघर येथील पाळणाघरात घडलेला गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर इथल्या मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आपल्या मुलांना पाळणाघरांमध्ये ठेवणारे पालकही प्रचंड धास्तवले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने महिला बालकल्याण विभागामार्फत शहरातील सर्व पाळणाघरांची नोंदणी करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

…अन्यथा कारवाई

पाळणाघर चालविणाऱ्या प्रत्येकाने पाळणाघराचे ठिकाण, तिथल्या कर्मचाऱ्यांची नावे, त्यांची चारित्र्यप्रमाणपत्र, मुलांसाठी इथे काय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात अशी सविस्तर माहिती पुढील आठ दिवसांत पालिकेकडे सादर करण्याचे आदेश काढले जाणार आहेत. जी पाळणाघरे ही माहिती देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करून बंद केली जातील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नोंदणी झाल्यानंतर या पाळणाघरांसाठी एक स्वतंत्र नियमावली पालिकेच्यावतीने तयार केली जाणार आहे. त्यात पाळणाघर आणि तिथले कर्मचारी कसे असावेत, यांसारख्या अनेक बाबींचा समावेश असेल. मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने पाळणाघरात काम करणाऱ्यांची आरोग्य तपासणीसुध्दा सक्तीची करण्याचे नियोजन असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज