अ‍ॅपशहर

बदलापुरातील चित्रकाराचे अमिताभकडून कौतुक

चित्रातील वेगळ्या शैलीने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बदलापूरच्या सचिन जुवाटकर या चित्रकाराची दखल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी सचिन यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या चित्रकलेचा गौरव केला. शास्त्रोक्त पद्धतीने साकारलेली चित्रे ही सचिन यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. अमिताभ यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेने सचिन यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Maharashtra Times 26 Sep 2017, 3:33 am
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम badlapur artist praised by amitabh bacchan
बदलापुरातील चित्रकाराचे अमिताभकडून कौतुक


चित्रातील वेगळ्या शैलीने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बदलापूरच्या सचिन जुवाटकर या चित्रकाराची दखल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी सचिन यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या चित्रकलेचा गौरव केला. शास्त्रोक्त पद्धतीने साकारलेली चित्रे ही सचिन यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. अमिताभ यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेने सचिन यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

सचिन जुवाटकर या बदलापूरमध्ये राहणाऱ्या चित्रकाराने रेखाटलेले चित्र पाहून प्रभावित झालेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी सचिन यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला होता. अखेर सचिन जुवाटकर यांच्याशी बच्चन यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या चित्राचे कौतुक केले. ‘आपल्यातील प्रामाणिकपणा आपल्या चित्रातून असाच राहू द्या,’ असे सांगत सचिन यांना अमिताभ यांनी सन्मानपत्र पाठवून त्यांच्या चित्रकलेचा गौरव केला. अमिताभ यांच्यासारख्या ऋषीतुल्य माणसाने माझ्या कलेला दिलेली दाद पाहून भारावून गेल्याचे सचिन यांनी सांगितले. बच्चन यांच्यासारख्या कलाकाराने माझ्या कलेची दखल घेणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे जुवाटकर यांनी सांगितले.

अमिताभ यांना चांगली कलाकृती देण्यासाठी त्यांचे चित्र रेखाटताना विविध प्रयोग करण्यात आले. त्यात पहिल्यांदाच रिअॅलिस्टिक पेंटिंग करत असताना काळ्या कॅनव्हासवर चित्र रेखाटण्यात आले असल्याचे जुवाटकर यांनी सांगितले आहे. तसेच ऑईल रंगांचा वापर करत असताना त्यात मोत्याची पावडर, चंदन आणि तुळशीचाही वापर यात करण्यात आला आहे. अनेकदा चित्रकार व्यावसायिकतेतून चित्राची निर्मिती करत असतात. मात्र मी चित्र तयार करत असताना त्यात संस्कृती आणि परंपरा ओतत असतो, असेही जुवाटकर यांनी सांगितले. फक्त अमिताभ नाही तर नटसम्राट नाना पाटेकर , राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शाहरुख खान, रोहित शेट्टी यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी सचिन जुवाटकर यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

जुवाटकर हे प्रयोगशील चित्रकार आहेत. ऋग्वेदात ज्याप्रमाणे दर्शनशास्त्र, मुहूर्तशास्त्र आणि पदार्थशास्त्र यांचा संयोग सांगितला आहे. तेच शास्त्र सचिन यांनी साकारलेल्या चित्रांतून दिसून येते. गणपतीचे चित्र रेखाटताना चंदन, अष्टगंध, मोतीचा वापर ते करतात. श्रीकृष्णाचे चित्र साकारताना तुळस, चांदीचा, तर शंकराचे चित्र साकारताना भस्माचा वापर ते करतात. त्यामुळे त्यात वेगळ्या प्रकारची कलाकृती समोर येते, असे सचिन सांगतात. हीच गोष्ट त्याच्या चित्रांना अन्य चित्रांपेक्षा वेगळे ठरवते. विशेष बाब म्हणजे सचिन यांनी अमिताभ यांना दिलेल्या गणेशाच्या चित्राला अमिताभ यांनी त्यांच्या जलसा बंगल्यात स्थान दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज