अ‍ॅपशहर

रणकपूर एक्स्प्रेसचे ब्रेक जाम; 'परे'वर रखडपट्टी

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते केळवे स्टेशन दरम्यान वांद्रे टर्मिनस येथून सुटलेल्या वांद्रे-रणकपूर एक्स्प्रेसचा ब्रेक जाम झाल्यामुळे सुमारे एक तास विरार ते डहाणू मार्ग विस्कळीत झाला होता. आता ही गाडी मार्गस्थ झाली असून पश्चिम रेल्वेवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स 29 Jun 2019, 7:36 pm
मटा वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranakpur-express

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते केळवे स्टेशन दरम्यान वांद्रे टर्मिनस येथून सुटलेल्या वांद्रे-रणकपूर एक्स्प्रेसचा ब्रेक जाम झाल्यामुळे सुमारे एक तास विरार ते डहाणू मार्ग विस्कळीत झाला होता. आता ही गाडी मार्गस्थ झाली असून पश्चिम रेल्वेवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

रणकपूर एक्स्प्रेस पाठोपाठ मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनसवरुन सुटलेल्या राजधानी, ऑगस्ट क्रांती, अजमेर, बीकानेर आदि गाड्या बोरीवली, वैतरणा स्टेशनात बाजूला काढून ठेवण्यात आल्या होत्या. विरार स्थानकातून सुटणारी विरार-सूरत शटल, डहाणूहून येणारी लोकल व चर्चगेट येथून सुटलेली डहाणू लोकलही थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या आता मार्गस्थ झाल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज