अ‍ॅपशहर

मुंबईतील महिला पोलिसाचं बीडच्या लष्करी जवानाशी सूत जुळलं अन् कल्याणमध्ये आक्रित घडलं

Police Woman File Complaint Against Jawan At Kalyan : लग्नाचे आमिष दाखवून जवानाने आपला गैरफायदा घेतला. आपली फसवणूक केली, असा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2023, 8:18 pm
डोंबिवली, ठाणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका लष्करी जवानाने कल्याणमध्ये राहून मुंबई पोलीस दलात नोकरी करत असलेल्या एका ३० वर्षाच्या महिला पोलिसाबरोबर ओळखल वाढवली. महिलेला लग्न करण्याचं आश्वासन या लष्करी जवानानं दिलं. त्यानंतर तिच्याशी संपर्क वाढवून तिच्याशी गेल्या दोन वर्षांच्या काळात अनेकदा शरीरसंबंध बनवले. आता महिलेच्या खालच्या जातीचा प्रश्न उपस्थित करून लष्करी जवानाने तिच्या बरोबर लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पीडित महिला पोलिसाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kalyan Crime News
मुंबईतील महिला पोलिसाचं बीडच्या लष्करी जवानाशी सूत जुळलं अन् कल्याणमध्ये आक्रित घडलं


लष्करी जवान आकाश जयधर घुले (वय २८) हा बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपच्या पुणे खडकी येथील डी. आय. विभागात प्रशिक्षक म्हणून काम करतो. महिला पोलीस मुंबई पोलीस दलात नोकरी करते. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आकाश बरोबर झाली. नियमित बोलण्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले, असं पोलिसांनी सांगितलं.

तुझ्या बरोबर लग्न करणार असल्याचं आश्वासन जवान आकाश याने महिलेला दिलं. त्यावर महिलेने विश्वास ठेवला. आकाश गेल्या वर्षापासून महिला पोलिसाच्या कल्याणमधील घरी नियमित येऊन आठ दिवस राहू लागला. आकाश मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केळगावचा रहिवासी आहे.

बैलगाडा शर्यतीत चोरट्यांचा डल्ला, लाखोंच्या चांदीच्या गदा चोरीला, कल्याणचा व्हिडिओ व्हायरल
महिला पोलिसाच्या घरी राहण्यास असताना आकाशने एक दिवस रात्री एका शीतपेयात गुंगीचं औषध टाकून ते महिला पोलिसाला पिण्यास दिले. या महिलेची काही वेळ शुद्ध हरपली. या संधीचा गैरफायदा घेत महिला पोलिसाच्या इच्छेविरुद्ध आकाशने तिच्यावर बलात्कार केला. वेळोवेळी आकाशने हे प्रकार केले, असा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या वीस दिवसांपूर्वी आकाशने कल्याणला येऊन महिलेवर बलात्कार केला. आणि नकार दिला तर तुझ्या बरोबर लग्न करणार नाही, अशी धमकी देत होता. अलिकडे आकाशचा चुलत भाऊ राजेश घुले याने महिला पोलिसाशी संपर्क केला. आकाश आता दुसऱ्या मुलीबरोबर विवाह करणार आहे, असं त्याने सांगितलं. असं काही नसल्याचं आकाशने पीडितेला सांगितलं. पण महिला पोलिसाने धाडस करून आकाशचं केज तालुक्यातील केळगाव गाठलं. तिथे महिला आकाशला भेटली. आणि मला तुझ्या आई वडिलांना घडला प्रकार सांगायचा आहे, असं म्हटली. आकाशने नकार देताच महिलेने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यावेळी आम्ही लग्न करणार आहे, असं आकाशने पोलिसांसमोर सांगितलं.
श्रीमंत गावाचं पितळ उघडं पडलं, मोठ्या पोलीस बंदोबस्त कारवाई, गावकऱ्यांनी केलं तरी काय?
पण आकाश नंतर बदलला. तुझी जात वेगळी आहे. आपलं जमणार नाही, अशी भूमिका आकाश घेऊ लागला. तर पीडित महिलेने लग्न करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर आकाशने पुन्हा महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं. आणि पीडितेच्या आई, वडिलांसह नातेवाईकांना केळगाव येथील गावी साखरपुडा कार्यक्रमासाठी बोलवलं. गेल्या शनिवारी महिला पोलिसाचं कुटुंब आकाशच्या केळगाव येथील घरी पोहचलं. आकाशचे कुटुंबीय, गावातील पंच समिती उपस्थित होती. बैठकीतील चर्चेनंतर कुटुंबीयांचा आपल्या लग्नाला विरोध आहे, असं आकाशने सांगितलं. तू खालच्या जातीची आहेस, अशी भूमिका आकाशने घेतली. यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली.

महत्वाचे लेख