अ‍ॅपशहर

'त्या' भोंदू बाबाचा तपास ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे

भक्तांचा विश्वास संपादन करून लैँगिक अत्याचार करणाऱ्या टिटवाळ्यातील मंजू माताजी या भोंदू बाबाचा अटकपूर्व जमीनअर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता हा गुन्हा ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या भोंदू बाबाच्या भक्तांनीच त्याचा पर्दाफाश करत त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर १५ दिवस उलटले, तरी अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

महाराष्ट्र टाइम्स 26 May 2019, 5:29 am
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police

भक्तांचा विश्वास संपादन करून लैँगिक अत्याचार करणाऱ्या टिटवाळ्यातील मंजू माताजी या भोंदू बाबाचा अटकपूर्व जमीनअर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता हा गुन्हा ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या भोंदू बाबाच्या भक्तांनीच त्याचा पर्दाफाश करत त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर १५ दिवस उलटले, तरी अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

कल्याणनजीक असलेल्या टिटवाळा येथील वैष्णवी माता मंदिरातील मुख्य पुजारी लालदीप सिंग उर्फ मंजू माता या भोंदू बाबाने श्रद्धाळू भक्तांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भक्तांनी केला. त्यांनी अंनिसच्या मदतीने टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी ११ मे रोजी भोंदू बाबाच्या मंदिरावर छापा टाकत कारवाईला सुरुवात केली. बाबाचे पितळ उघडे पडताच बाबा मंदिरातून फरार झाला आहे. भोंदू बाबाने अटकेपासून बचाव करण्यासाठी गेल्या आठवड्यात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता हा गुन्हा टिटवाळा पोलिसांकडून ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज