अ‍ॅपशहर

Virar: समुद्रकिनारी रंगला क्रिकेटचा डाव; पोलिसांना पाहताच मुलांच्या समुद्रात उड्या

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली आहे. हे लॉकडाऊन विद्यार्थ्यांच्या मात्र पथ्यावर पडले आहे. (boys jump into sea while playing cricket)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2020, 6:47 pm
वसई- विरारः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली आहे. हे लॉकडाऊन विद्यार्थ्यांच्या मात्र पथ्यावर पडले आहे. विरारच्या काही तरुणांनी या सुट्टीत क्रिकेट खेळण्यासाठी थेट समुद्र किनारा गाठला आहे. मात्र, बंदीच्या नियमांचे उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्या या तरुणांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पोहोचले तेव्हा मात्र या तरुणांचा एकच गोंधळ उडाला. यातील काही तरुणांनी तर थेट समुद्रातच उड्या घेतल्या. (boys playing cricket on beach)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virar arnala


वाचाः इथे माणुसकी हरली! करोना झाला म्हणून गावाने पूर्ण कुटुंबालाच केले बहिष्कृत

शुक्रवारी सकाळी समुद्रकिना-यावर काही तरुण मुले बंदी आदेशाचे उल्लंघन करून क्रिकेट खेळत होती. पोलिसांना त्याची माहिती मिळताच एक पथक कारवाई करण्यासाठी गेले. पोलिसांनी तिथं पाहताच मुलं घाबरली आणि मात्र पळण्यासाठी जागा नसल्याने या तरुणांनी चक्क समुद्रात उड्या टाकल्या. बहुतांश मुले ही मच्छिमारांची असल्याने पोहण्यात तरबेज आहेत त्यामुळे हे तरुण समुद्रात पळाले आणि तिथेच जाऊन लपले. पोलीस आल्यानंतर मुलांची पळापळ झाल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचाः राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 'या' नेत्यानं घेतली सुप्रिया सुळेंची भेट; चर्चेला उधाण

विरार, अर्नाळा गावात सध्या करोनाचे १४८ रुग्ण आढळले असून ४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे आणि सर्व व्यवहारांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, वसई-विरारमध्ये गुरुवारी ३०५ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये वसई-विरार शहरी भागातील २८३ रुग्णांचा समावेश असून ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. वसई-विरार शहरी भागात आढळून आलेल्या २८३ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या १० हजार ६०६ झाली आहे. सात रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा २१९ झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज