अ‍ॅपशहर

बस उलटून सात विद्यार्थी जखमी

डहाणू जवळ दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून सात विद्यार्थी जखमी झाले. गुजरात राज्यातील उंबरगावहून डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे दहावीच्या परीक्षेसाठी हे विद्यार्थी येत होते.

Maharashtra Times 18 Mar 2016, 12:28 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus accident
बस उलटून सात विद्यार्थी जखमी


डहाणू जवळ दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून सात विद्यार्थी जखमी झाले.

गुजरात राज्यातील उंबरगावहून डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे दहावीच्या परीक्षेसाठी हे विद्यार्थी येत होते. गुरुवारी दहावीचा इतिहासाचा पेपर होता, सकाळी उंबरगावहून खासगी स्कूलबसमधून बोर्डीमधील सुपेह हायस्कूल व नॅशनल स्कूल आणि पूज्य चित्रे गुरुजी हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर मराठी आणि इंग्रजी मध्यमांचे विद्यार्थी प्रवास करत असताना उंबरगाव जवळील वृन्दावन गार्डन जवळ ही बस उलटली.

बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी प्रवास करीत होते त्यापैकी सात विद्यार्थी जखमी झाले. सुपेह विद्यालयाचे उपप्राचार्य अजीत माच्छी आणि बसचालकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना नजिकच्या घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि प्राथमिक उपचारानंतर या सर्वांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचविले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज