अ‍ॅपशहर

ठाण्यातील व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

व्यवसायासाठी ६० लाख रुपये घेऊन त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील जिम ट्रेनिंग व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या प्रकरणी अंधेरी येथील इस्माईल कादर खान (४०) याच्या विरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 8 Aug 2017, 3:00 am
ठाणे : व्यवसायासाठी ६० लाख रुपये घेऊन त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील जिम ट्रेनिंग व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. या प्रकरणी अंधेरी येथील इस्माईल कादर खान (४०) याच्या विरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम businessman looted in thane
ठाण्यातील व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक


रवीश डोबानी (४६) यांचा जिम ट्रेनिंगचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी त्यांची ओळख इस्माईलशी झाली होती. त्याला व्यवसायासाठी पैशांची गरज होती. ६० लाख रुपये दिल्यास नफा म्हणून १ लाख २५ हजार रुपये सुरुवातीला सहा महिने देतो, असे खान याने सांगितले होते. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये एका व्यक्तीकडे डोबानी यांनी ६० लाख रुपये दिले. या व्यक्तीने त्यांना पोस्ट डेटेड चेक आणि कार दिली. परंतु केवळ तीन महिनेच नफा दिला. पैसे मागूनही त्याने दिले नाहीत. अशा प्रकारे आरोपीने ६० लाख रुपये १५ लाख ५० हजार रुपयांचा नफा असे ७५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज