ठाणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती कारने दिलेल्या धडकेत राजेश तायडे (४३) यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरातील गौरस स्वीट्स समोर घडली. या प्रकरणी कारचालक दर्पण शिरसाट (२१) याला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. मृत्युमुखी पडलेले तायडे हे नोर्वाटीस कंपनीत कार्यरत होते. ते कंपनीतून आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला.
कारच्या घडकेत मृत्यू
भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती कारने दिलेल्या धडकेत राजेश तायडे (४३) यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ठाण्यातील मानपाडा परिसरातील गौरस स्वीट्स समोर घडली.
Maharashtra Times 27 Jun 2016, 3:00 am