अ‍ॅपशहर

​ गाड्या चोरणाऱ्यांना अटक

गाड्या चोरणाऱ्या तिघा लुटारूंना जेरबंद करण्यात वसईतील वालीव पोलिसांना यश आले आहे. या चोरांकडून सात लाख ७० हजार रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली व एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Maharashtra Times 15 Dec 2016, 3:17 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car theft three arrested
​ गाड्या चोरणाऱ्यांना अटक


गाड्या चोरणाऱ्या तिघा लुटारूंना जेरबंद करण्यात वसईतील वालीव पोलिसांना यश आले आहे. या चोरांकडून सात लाख ७० हजार रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली व एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

५ डिसेंबर रोजी रात्री वसई धानीव येथील एक मोटारसायकल चोराने लांबवली होती. याबाबत ९ डिसेंबर रोजी वालीव पोलिस स्टेशनात गुन्हा नोंद करण्यात आला होता. वाहन चोरी गुन्ह्याच्या तपासासाठी धानीव परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, धानीव परिसरात सापळा रचण्यात आला होता. या वेळी दिनेश बिरगुमानप्रताप सिंग (२८, एव्हरशाइन सिटी, वसई पूर्व), युवराजन किसन चव्हाण (२१, रा. कामण), अनिकेत उर्फ ईलू अनंत गायकवाड (२५, रा. सातीवली) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे, असे वालीवचे पोलिस इन्स्पेक्टर महेश पाटील यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज