म. टा. वृत्तसेवा, ठाणे
लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश तोंडलेकर, मुरलीधर तोंडलेकर, प्रसाद तोंडलेकर, नंदकुमार तोंडलेकर अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण नेरळ भागात राहतात. त्यांच्याविरुद्ध विनीत थोरवे यांनी तक्रार दाखल केली आहे.
थोरवे यांचा जुन्या चार चाकी गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गाड्या खरेदी करण्यासाठी आरोपींनी ५४ लाख ६५ हजार रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम परत केली नाही. आर्थिक फसवणुकीबाबत थोरवे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.