कल्याण : इमारतीचा जिना चढून जात असलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या एका सोनसाखळी चोराला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून विष्णूनगर पोलिसांनी या गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट हॉटेलनजीक असलेल्या इमारतीमध्ये राहणारी ५५ वर्षीय महिला बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जिने चढत घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. महिलेने आरडा ओरड करताच आसपासच्या रहिवाशांनी चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रवींद्र पास्ते असे या आरोपीचे नाव आहे.
सोनसाखळीचोर गजाआड
इमारतीचा जिना चढून जात असलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या एका सोनसाखळी चोराला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून विष्णूनगर पोलिसांनी या गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
Maharashtra Times 10 Feb 2017, 3:00 am