अ‍ॅपशहर

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

सासरच्यांनी करणी केली आहे. मी तुझ्यावरची करणी उतरवतो. माझ्या अंगात शक्ती आहे, असे भासवून माझे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी भीती दाखवत एका पोलिस कॉन्स्टेबलने अन्य दोघांच्या मदतीने महिलेकडून तब्बल ५ लाख ९७ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची बाब ठाण्यात उघडकीस आली आहे. राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 31 Dec 2016, 3:15 am
पोलिस कॉन्स्टेबलसह तिघांवर गुन्हा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cheated women on the name of black magic
जादूटोण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

सासरच्यांनी करणी केली आहे. मी तुझ्यावरची करणी उतरवतो. माझ्या अंगात शक्ती आहे, असे भासवून माझे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी भीती दाखवत एका पोलिस कॉन्स्टेबलने अन्य दोघांच्या मदतीने महिलेकडून तब्बल ५ लाख ९७ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची बाब ठाण्यात उघडकीस आली आहे. राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित ३१ वर्षीय महिला युएईमध्ये पतीसोबत राहत होती. मात्र काही घरगुती समस्येमुळे ठाण्यात पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या आईकडे राहण्यास आली. दरम्यान आरोपी मनोहर पाटोळे याच्याशी तिची ओळख होती. दोघांची भेट झाली त्यावेळी महिलेने आपली घरगुती समस्या आरोपीला सांगितली. त्यानंतर तिच्यावर करणी झाल्याचे सांगत आरोपीने महिलेकडून साडेपाच लाखांहून रुपये वेळोवेळी घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर राबोडी पोलिस ठाण्यात पाटोळे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सध्या कार्यरत नाही

कॉन्स्टेबल असलेला आरोपी मनोहर पाटोळे याला ८ ते ९ वर्षांपूर्वी निलंबित केले होते. सध्या तो कार्यरत नसल्याचे पोलिस उपआयुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज