अ‍ॅपशहर

चेक बाऊन्सप्रकरणी सहा जणांना कारावास

धनादेश बाऊंस झाल्याप्रकरणी गुरुवारी विनायक एंटरप्रायजेस कंपनीच्या सहा जणांना एका वर्षाचा कारावास आणि तक्रारदाराला २६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी उल्हासनगर न्यायालयाने दिले.

Maharashtra Times 19 Jan 2018, 2:52 am
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम check-bounce


धनादेश बाऊंस झाल्याप्रकरणी गुरुवारी विनायक एंटरप्रायजेस कंपनीच्या सहा जणांना एका वर्षाचा कारावास आणि तक्रारदाराला २६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी उल्हासनगर न्यायालयाने दिले.

उल्हासनगर न्य़ायालयातील न्यायाधीश आर. डी. चौघुले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. कल्याण येथील गोपे माधवदास रोचलानी यांची माधव कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. रोचलानी यांनी विनायक एंटप्रायजेस कंपनी आणि यातील सहा भागीदारांसोबत २००६ मध्ये ८५ कोटी रुपयांना ६० एकर जागेत विकास करण्यासाठी करार केला होता. यासाठी रोचलानी यांनी ८.५ कोटी रुपये या सहा जणांना दिले होते. मात्र, काही वर्षांनी या सहा जणांनी हा करार रद्द केला आणि नुकसान भरपाईसह पैसे परत करू असे रोचलानी यांना सांगितले. त्यानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर २००८ दरम्यान या सहा जणांनी रोचलानी यांना १६.५० कोटी रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश बाऊन्स झाला. यानंतर रोचलानी यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायाधीश आर. डी. चौघुले यांनी या सहा जणांना आणि कंपनीला प्रत्येकी ३ कोटी ७३ लाख २१ हजार ५०० रुपये आणि एका वर्षाचा कारावास सुनावला आहे. तसेच रोचलानी यांना नुकसान भरपाई न दिल्यास आणखी तीन महिन्यांचा कारावास या सहा जणांना सुनावण्यात येईल, असे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज