अ‍ॅपशहर

विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय; 'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब

Eknath Shinde And Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे यांनी आज गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2022, 9:56 pm
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. सगळीकडे गणरायाचं आगमन झालं आहे, राज्यात उत्सावाच आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणरायाचं दर्शन घेतलं बाकी काहीच चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray and cm Eknath Shinde


असे असले तरीही यापूर्वी कधीही एकनाथ शिंदे गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी गेलेलं फारसे दिसले नाही. तर दुसरीकडे राज ठाकरे हे नवरात्री ठाण्यात जात असतात, मात्र त्यावेळही शिंदे आजच्या प्रमाणे दिलखुलास हसताना आणि बोलताना दिसले नाहीत. त्यामुळे आजची भेट चर्चेची ठरली. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी राजकीय चर्चा होतील असे ट्विट केले आहे. मनसे आमदार यांनी आपल्या ट्विट मध्ये विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय. 'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाचा- टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आणि ठाणे जिल्ह्यातील विविध विषयावर नेहमीच शिंदे पितापुत्रांना विरोध दर्शवला आहे, तर शिंदे यांच्या विरोधात सुद्धा आपल्या भूमिका मांडल्या आहेत, तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे आजचे ट्विट पाहता मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का हे पाहावे लागेल.

वाचा- टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

काय केले आहे ट्विट.....

प्रबोधनकार ते बाळासाहेब ते राजसाहेब.विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक' झालाय. 'एक' साहेब आणि 'एक'नाथ साहेब.
#श्रीगणेशा #बाप्पा_मोरया

लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख