अ‍ॅपशहर

बेपत्ता तक्रारदार न्यायालयात हजर

७४ जणांचा बळी घेणाऱ्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेतील तक्रारदार शरीफउद्दीन मुक्तार अन्सारी हाच गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याने या प्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याचे भवितव्यच धोक्यात आले होते. मात्र, बुधवारी सुनावणीदरम्यान अन्सारी न्यायालयात हजर राहिल्याने सरकारी पक्षासह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु, तो भीतीच्या छायेखाली आहे. मी घरात एकटाच कमावता आहे. या प्रकरणातील आरोपी मोठे असून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्याने न्यायालयात साक्षीदरम्यान सांगितल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी न्यायालयात त्याला रडूही कोसळले.

Maharashtra Times 23 Mar 2017, 2:40 am
लकी कंपाऊंड दुर्घटना खटल्याचे कामकाज सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम complainant appear in court
बेपत्ता तक्रारदार न्यायालयात हजर

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

७४ जणांचा बळी घेणाऱ्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेतील तक्रारदार शरीफउद्दीन मुक्तार अन्सारी हाच गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याने या प्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याचे भवितव्यच धोक्यात आले होते. मात्र, बुधवारी सुनावणीदरम्यान अन्सारी न्यायालयात हजर राहिल्याने सरकारी पक्षासह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु, तो भीतीच्या छायेखाली आहे. मी घरात एकटाच कमावता आहे. या प्रकरणातील आरोपी मोठे असून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्याने न्यायालयात साक्षीदरम्यान सांगितल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी न्यायालयात त्याला रडूही कोसळले.

४ एप्रिल २०१३ रोजी शिळफाटा येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच जखमींची संख्याही मोठी होती. या दुर्घटनेला जबाबदार धरत पालिका अधिकारी, बिल्डर, पोलिस, ठेकेदार अशा अनेकांना पोलिसांनी गजाआड केले होते. अवघ्या काही महिन्यांत आठ मजली इमारत उभी करण्यात आली होती. चिंधी व्यावसायिक असलेले शरीफउद्दीन मुक्तार अन्सारी याचे याच इमारतीच्या तळमजल्यावर दुकान होते. दुर्घटनेत तो बचावला आणि त्यालाच पोलिसांनी फिर्यादी करत तक्रार नोंदवली होती. त्यामुळे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार होता. परंतु ठाणे सत्र नायायालयात सुनावणीच्या वेळी उपस्थितीतच राहत नव्हता. त्यामुळे तो गेला कोठे हा प्रश्न निर्माण होऊन या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. न्यायालयाने अटक वॉरंटही काढल्याने खळबळ उडाली होती. परंतु, बुधवारपासून अतिरिक्त सत्र नायाधीश ए. एन. करमकर यांच्या न्यायालयात केसच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी बेपत्ता अन्सारी सुनावणीच्या वेळी उपस्थित राहिला. यावेळी त्याची साक्ष तपासण्यात आली. आरोपी धनधांडगे असून आपल्या जिवाला धोका असल्याचे यावेळी त्याने न्यायालयात सांगितले. यावर विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांनी न्यायालयात तक्रारदाराला पोलिस सरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

ओळखपरेडही झाली!

अन्सारी याची साक्ष यावेळी नोंदवण्यात आली. इमारत अत्यंत घाईगडबडीत उभारण्यात आली. त्यामुळेच तीन महिन्यांतच ती कोसळली. बिल्डर जमील, सलीम यांच्यासह ठेकेदार लक्ष्मण राठोड अशा एकूण पाच आरोपींना त्याने यावेळी ओळखले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बाजूला अन्य एका मोकळ्या इमारतीवर पालिकेने कारवाई केली होती. त्यामुळे पालिकेकडून कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी बिल्डरांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये पैसे न घेता रहिवाशांना ठेवले होते, असेही त्याने सांगितले. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या येत होत्या, अशीही साक्ष त्याने दिली आहे. पुढील सुनावणी चार एप्रिल रोजी होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज