म. टा. प्रतिनिधी, ठाणे : प्रत्येकजण एकमेकांना भेटल्यानंतर 'हाय' बोलतो. मात्र, याच 'हाय'वरून बुधवारी पहाटे घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा परिसरात जोरदार गोंधळ झाला असून मैत्रिणीला हाय बोलणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला मित्राने जाब विचारल्यावरून जोरदार भांडण झाले. नंतर भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. व्यवस्थापकासह त्याचा हॉटेलमालक आणि इतर १० ते १५ जणांनी मिळून काही जणांना लोखंडी सळई, लाकडी दांडका, हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली असून याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत काही जणांना दुखापतही झाली आहे. यावेळी भांडण पाहण्यासाठी गेलेल्यांनाही टोळक्याने मारहाण केली आहे. यामध्ये एक जण जबर जखमी झाला आहे.
‘हाय’ बोलण्यावरून वाद; गाड्यांची तोडफोड
प्रत्येकजण एकमेकांना भेटल्यानंतर 'हाय' बोलतो. मात्र, याच 'हाय'वरून बुधवारी पहाटे घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा परिसरात जोरदार गोंधळ झाला असून मैत्रिणीला हाय बोलणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला मित्राने जाब विचारल्यावरून जोरदार भांडण झाले.
Maharashtra Times 26 Dec 2019, 5:42 am