वाडा : पालघर जिल्ह्यात करोनापासून मुक्त असलेल्या विक्रमगड शहरात करोनाचा शिरकाव झाला असून माहेरी आलेल्या एका डॉक्टर महिलेला संसर्ग झाल्याचे उघड झाले. या महिलेचा पतीदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही महिला डॉक्टर बोरीवली येथे राहत असून डहाणू सेवेत आहे. ती पतीसोबत मंगळवारी विक्रमगड येथे आली होती. या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना शीळ येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
विक्रमगडमध्ये करोनाचा शिरकाव
पालघर जिल्ह्यात करोनापासून मुक्त असलेल्या विक्रमगड शहरात करोनाचा शिरकाव झाला असून माहेरी आलेल्या एका डॉक्टर महिलेला संसर्ग झाल्याचे उघड झाले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2020, 4:00 am