अ‍ॅपशहर

ठाणे शहरात २३ नवे करोनाबाधित, एकूण संख्या २७९ वर

ठाणे शहरातही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. ठाणे शहरात आज, आतापर्यंत २३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण संख्या आता २७९वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2020, 6:54 pm
ठाणे: मुंबईप्रमाणेच ठाण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आज, गुरुवारी आतापर्यंत २३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण बाधितांचा आकडा २७९वर गेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid 19


दुसरीकडे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १८ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १३ नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या २४ तासांत मीरा-भाईंदरमध्ये एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बाळाच्या अंत्यविधीलाही पालकांना जाता आलं नाही

हिंगोलीत ३ एसआरपीएफ जवानांसह ४ बाधित

ठाणे शहरात आज नव्याने सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये ६ ते १७ वर्षे वयोगटातील सहा मुलांचा समावेश आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. ठाण्यातील एकूण बाधितांची संख्या २७९ वर पोहोचली आहे. मुंब्रामध्ये सर्वाधिक ५० रुग्ण आहेत. तर लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेटमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० हून अधिक आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात बुधवारी ६४ नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळं करोनाबाधितांचा आकडा ८६७वर पोहोचला होता.

उपचाराशिवाय कुणालाही रुग्णालयातून परत पाठवू नका: उद्धव ठाकरे

औरंगाबादेत ३ दिवसांत करोनाबाधित तिप्पट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज