बदलापूर : बदलापूर शहरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राज्य शासनाकडून लागू लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्यासाठी आज संध्याकाळी नगरपालिकेत आमदार, नगर परिषद अधिकारी यांच्या पार पडलेल्या बठकीत निर्णय घेण्यात आला. बदलापूरमधील कोविड स्थितीबाबत झालेल्या बैठकीनंतर शहरात एक आठवडा पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्याने शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र अशा कुठल्याही लॉकडाऊन बाबत नगरपरिषदेने अधिकृत पत्रक काढलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी शहरात आहे त्याच प्रमाणे लॉकडाऊनचे नियम लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बदलापुरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने व भाजीपाला उपलब्ध असणार आहे. औषध दुकाने व वैद्यकीय सेवा २४ तास सुरू राहतील. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.