अ‍ॅपशहर

डहाणूजवळचे मालगाडीचे डबे हटवले, वाहतूक सुरू

पश्चिम रेल्वेवरील डहाणू स्थानकाजवळ सोमवारपासून सुरू असलेले ट्रॅक दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी ११ वाजता पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच आज सकाळी ११ वाजून २० मिनिटानी मुंबईहून निजामुद्दीनकडे जाणारी दुरांतो एक्सप्रेस या मार्गावरून रवाना करण्यात आली.

Maharashtra Times 5 Jul 2016, 3:06 pm
>> नरेंद्र पाटील । पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dahanu railway line problem solve
डहाणूजवळचे मालगाडीचे डबे हटवले, वाहतूक सुरू

पश्चिम रेल्वेवरील डहाणू स्थानकाजवळ सोमवारपासून सुरू असलेले ट्रॅक दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी ११ वाजता पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच आज सकाळी ११ वाजून २० मिनिटानी मुंबईहून निजामुद्दीनकडे जाणारी दुरांतो एक्सप्रेस या मार्गावरून रवाना करण्यात आली.

पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू-वाणगाव स्थानकांदरम्यान सोमवारी पहाटे मालगाडीचे ११ डबे घसरले होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गावरील विरार-डहाणू दरम्यानची वाहतूक ठप्प होती. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील त्याचा परिणाम झाला होता. काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा मुंबईकडे येणाऱ्या अप मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र डाऊन मार्गावरील काम आज सकाळी ११ पर्यंत सुरू होते. अखेर ११ वाजून २० मिनिटांनी पहिली गाडी डाउन मार्गावरून रवाना करण्यात आली.

दरम्यान, सोमवारी झालेल्या या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला. अप मार्ग सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवासाची मुभा प्रवाशांना देण्यात आली होती. मात्र आता दोन्ही रेल्वेमार्ग सुरू करण्यात आल्याने प्रवाशांचा त्रास कमी होईल. असे असले तरी वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज