अ‍ॅपशहर

कुठे दीपाली, कुठे सोफिया; शिवसेनेच्या महिला उमेदवाराची 'आयडिया'

'नावात काय आहे?' असं आपण अनेकदा सहज विचारतो. पण निवडणूक आणि मतदानाचा जिथं प्रश्न येतो, तिथं असल्या म्हणी निरर्थक ठरतात. तिथं नावच महत्त्वाचं ठरतं. मग ते पक्षाचं असो की उमेदवाराचं. ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सध्या याचीच प्रचिती येत आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या आवश्यकतेनुसार दोन-दोन नावांचा वापर करून प्रचार करत असल्याची चर्चा आहे.

Nishikant Karlikar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2019, 1:46 pm
ठाणे: 'नावात काय आहे?' असं आपण अनेकदा सहज विचारतो. पण निवडणूक आणि मतदानाचा जिथं प्रश्न येतो, तिथं असल्या म्हणी निरर्थक ठरतात. तिथं नावच महत्त्वाचं ठरतं. मग ते पक्षाचं असो की उमेदवाराचं. ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सध्या याचीच प्रचिती येत आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या आवश्यकतेनुसार दोन-दोन नावांचा वापर करून प्रचार करत असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deepali in one area sophia in another shiv sena candidate campaigning with two different names
कुठे दीपाली, कुठे सोफिया; शिवसेनेच्या महिला उमेदवाराची 'आयडिया'


विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान युवा नेते व विद्यमान आमदार जीतेंद्र आव्हाड पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांना धोबीपछाड देण्यासाठी यंदा शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मराठी मतदारांबरोबरच मुस्लिमांची निर्णायक संख्या असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेनं दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे.

वाचा: ठाण्यात राष्ट्रवादीची मनसेला साथ

४१ वर्षीय दीपाली सय्यद या मूळच्या दीपाली भोसले आहेत. लग्नानंतर त्या सोफिया सय्यद झाल्या आहेत. त्यांच्या या दोन्ही नावाचा प्रचारात अत्यंत हुशारीनं उपयोग करून घेतला जात आहे. त्यांचं अधिकृत नाव दिपाली सय्यद असंच आहे. निवडणूक अर्जातही त्याच नावाची नोंद आहे. प्रचारातही हेच नाव वापरलं जात आहे, अशी माहिती शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दिली. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे.

वाचा: ठाण्यातील बंडखोरी रोखण्यात युतीला अपयशच

हिंदू बहुल कळवा व अन्य भागांत त्यांची ओळख दीपाली म्हणून करून दिली जात आहे. तर, मुस्लिमबहुल भागांमध्ये त्यांना सोफिया सय्यद म्हणून पुढं केलं जात आहे. मुंब्र्यातील अनेक मतदारांना त्यांची ओळख सोफिया म्हणूनच करून दिली जात आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या प्रतिनिधीनं याबाबत दीपाली सय्यद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचारात व्यग्र असल्यामुळं त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज