अ‍ॅपशहर

‘मासेमारी कायद्यात सुधारणा करा’

केरळ राज्याच्या धर्तीवर मासेमारीवर सनियंत्रण व देखरेख आणि नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मासेमारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी आग्रह धरण्याची मागणी मच्छिमारांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याकडे केली आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand of development in fishing law
‘मासेमारी कायद्यात सुधारणा करा’


केरळ राज्याच्या धर्तीवर मासेमारीवर सनियंत्रण व देखरेख आणि नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मासेमारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी आग्रह धरण्याची मागणी मच्छिमारांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील खाडीतील बोटीच्या मार्गात साचलेला गाळ व किनारपट्टीवरील ढासळलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी तसेच मच्छीमारांच्या विविध समस्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी खासदार चिंतामण वनगा, आमदार अमित घोडा, राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त विनोद नाईक, उपायुक्त राजेंद्र जाधव, मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी व सागरी पतन विभागाचे अधिकारी तसेच मच्छीमार नेते नंदू पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी चेअरमन राजेंद्र मेहेर, अशोक अंभिर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मच्छिमारांच्या समस्याविषयी चर्चा करताना प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांच्या हद्दीत व केंद्र सरकारच्या ईईझेड क्षेत्रात ९० दिवसांची सक्तीची पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे खासदारांनी शिफारस करावी व अंमलबजावणीसाठी आग्रह धरावा. समुद्र, नद्या धरणे तसेच बंधाऱ्यातील पावसाळी मासेमारी बंदी घालून पर्यावणाचे रक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्याचे व केंद्र सरकारचे मासेमारीवर सनियंत्रण, देखरेख व नियंत्रणासंबंधी मासेमारी कायद्यात सुधारणा प्रस्तावित आहे. त्यात प्रामुख्याने मासळीच्या लहान पिल्लांच्या मरतुकीवर व किनाऱ्यावर आणण्याबाबतच्या निर्बंधासाठी सरकारस्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. या बाबतचा कायदा केरळ राज्यात यापूर्वीच अंमलात आलेला आहे. महाराष्ट्रातही असा कायदा होऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी मच्छिमारांनी यावेळी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज