अ‍ॅपशहर

डेंग्यू, मलेरियाचा धोका कायम

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या धूर फवारणीत होणारी अनियमितता आणि जागोजागी पसरलेले कचऱ्याचे ढीग, यामुळे रोगांचा प्रभाव कमी होताना दिसत नसून डोंबिवलीत मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण अजूनही आढळत आहेत. डेंग्यू आणि मलेरियासोबत लेप्टोस्पायरासिसचे संशयित रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे एकीकडे उपचार सुरू असले, तरी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Times 24 Oct 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम denger of dengue maleria as it is
डेंग्यू, मलेरियाचा धोका कायम

पालिकेकडून करण्यात येणाऱ्या धूर फवारणीत होणारी अनियमितता आणि जागोजागी पसरलेले कचऱ्याचे ढीग, यामुळे रोगांचा प्रभाव कमी होताना दिसत नसून डोंबिवलीत मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण अजूनही आढळत आहेत. डेंग्यू आणि मलेरियासोबत लेप्टोस्पायरासिसचे संशयित रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे एकीकडे उपचार सुरू असले, तरी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

डोंबिवलीत रस्त्याच्या कडेला, कोपऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. याखेरीज पडलेला कचरा दररोज उचललाच जातो, याची शाश्वती नाही. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी आणि कडेला जमा होणारे पाणी, यामुळे डासांची पैदास वाढते. डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या विशाल बढे यांना डेंग्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच आयरे रोड परिसरात फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाने केवळ पाहणी केली, त्यावर अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत, अशी तक्रारही करण्यात येत आहे.

पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. छोट्या दवाखान्यातदेखील रुग्णांची संख्या अधिक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज