अ‍ॅपशहर

पर्यावरण संवर्धनासाठी देवराई!

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंडळाचा ‘देवराई’ हा वनीकरण प्रकल्प टिटवाळ्याजवळ असणाऱ्या रुंदी या गावात सुरू होणार आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा पहिला पर्यावरण संवर्धन प्रकल्प असून या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन रविवार, २९ जानेवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य वनविभागाकडून या संस्थेलाही जागा मिळाली असून या जागेवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 4:00 am
पर्यावरण दक्षता मंडळ लावणार ४० हजारवृक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devrai in thane district
पर्यावरण संवर्धनासाठी देवराई!

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंडळाचा ‘देवराई’ हा वनीकरण प्रकल्प टिटवाळ्याजवळ असणाऱ्या रुंदी या गावात सुरू होणार आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा पहिला पर्यावरण संवर्धन प्रकल्प असून या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन रविवार, २९ जानेवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य वनविभागाकडून या संस्थेलाही जागा मिळाली असून या जागेवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे.

सुमारे पन्नास एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहत असून, त्या जागेचा शास्त्रीय अभ्यास डॉ. मानसी जोशी, निवृत्त वनअधिकारी अनिल ठाकरे, डॉ. नागेश टेकाळे आणि डॉ. गोविंद पारटकर यांनी केला आहे. त्यामुळे येथील जागेच्या जैवविविधतेप्रमाणे साधारण चाळीस प्रजाती असणाऱ्या चाळीस ते सत्तर हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. दोन वर्षात वृक्ष लागवड आणि पुढील पाच वर्ष लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती ‘मटा’शी बोलताना संस्थेचे विद्याधर ठाणेकर यांनी दिली.

पहिल्या टप्यात लावण्यात येणारी साधारण तेरा हजार वृक्ष संस्थेकडे उपलब्ध असून उर्वरित रोप तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ही वृक्षलागवड करण्यासाठी जिल्ह्यातील विविध कॉलेजांचे राष्ट्रीय स्वयंसेवक, वृक्षप्रेमी आणि शहरातील लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन या जागेत जलसंधारण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या या संस्थेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने सुयोजित पद्धतीने देवराई प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज