अ‍ॅपशहर

विरारमध्ये चेंबरवरील झाकणे गायब

वसई-विरार शहर महापालिका स्वच्छतेबाबत जनजागृती करीत असली, तरी अनेक ठिकाणी उघडी गटारे तसेच चेंबरवरील झाकणे गायब आहेत. वसई-विरार पालिकेचे मुख्यालय असलेल्या विरार शहरातच अशी झाकणे गायब असल्याचे चित्र दिसत आहे.

Maharashtra Times 20 Feb 2018, 10:11 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम disappears in the chamber in virar
विरारमध्ये चेंबरवरील झाकणे गायब


वसई-विरार शहर महापालिका स्वच्छतेबाबत जनजागृती करीत असली, तरी अनेक ठिकाणी उघडी गटारे तसेच चेंबरवरील झाकणे गायब आहेत. वसई-विरार पालिकेचे मुख्यालय असलेल्या विरार शहरातच अशी झाकणे गायब असल्याचे चित्र दिसत आहे. त्याकडे पालिकेच्या बांधकाम विभागाचे इंजीनिअर, तसेच त्या प्रभागातील नगरसेवकांचेही सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

विरार पश्चिमेला जुन्या विवा कॉलेज मागील हा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथाचा मोठ्या प्रमाणात लोक वापर करतात. रस्त्याच्या कडेला फूटपाथ आहे. तेथील काही झाकणे गायब झाली आहेत. गेले काही महिने ही झाकणे गायब असली, तरी पालिकेच्या बांधकाम विभागाचे त्याकडे लक्ष गेलेले नाही यावरून प्रशासन किती सुस्त आहे हे दिसते. त्यातच परिसरात राहणाऱ्या नगरसेवकांनी फिरून हि झाकणे बसवून का घेतली नाहीत, असा प्रश्नही लोक विचारत आहेत.

झाकणे गायब झाल्याने ती उघडी पडली आहेत. त्यावर जवळच्या झाडांची लोखंडी ट्री-गार्डस व झावळ्या, झाडाच्या फांद्या टाकण्यात आल्या असून 'येथे धोका आहे' असे नागरिकच सूचित करीत आहेत. या पदपथवरून दररोज परिसरातील नागरिक,महिला आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी ये-जा करतात. पण गेले कित्येक महिने झाले त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. पालिकेकडून फक्त जाहिराती व बोर्ड लावण्यात येतात. मात्र, या समस्या कायम का राहत आहेत. या मॅनहोल्सवर झाकणे बसविण्यात यावीत अन्यथा कोणी पादचारी येथे पडून आपल्या जिवाला मूकल्यावर बांधकाम विभाग जागा होणार आहे का, असा सवाल मनसे विरार शहर उपाध्यक्ष अभिजीत चौधरी यांनी केला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने त्वरित येथे कार्यवाही करावी अन्यथा पालिकेच्या प्रतिकृती या उघड्या मॅनहोल्समध्ये उभराव्या लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज