अ‍ॅपशहर

सात दिवसांपासून वीज खंडित

ऐन परीक्षेच्या काळात जव्हार तालुक्यातील देहेरे गावातील विद्युत वाहिनीचे खांब पडल्याने गेल्या आठवडाभरापासून येथील तीन पाडे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

Maharashtra Times 21 Feb 2018, 1:37 pm
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम disrupted power for seven days
सात दिवसांपासून वीज खंडित


ऐन परीक्षेच्या काळात जव्हार तालुक्यातील देहेरे गावातील विद्युत वाहिनीचे खांब पडल्याने गेल्या आठवडाभरापासून येथील तीन पाडे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

गेल्या आठवड्यात जव्हार-मोखाडा परिसरात आलेल्या वादळामुळे पाच लोखंडी खांब ढासळले आहेत. त्यामुळे देहेरे ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा उक्षीपाडा, देवगाव या तीन पाड्यांत अंधार पसरला आहे. याबाबत जव्हार येथील वीज वितरण कंपनीला कळवूनही खांब सरळ करण्यात आले नाहीत. तसेच, दुरुस्तीही करण्यात आलेली नाही.

जव्हार तालुक्यातील या तीन पाड्यांतील नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या तीन पाड्यांत पावणेतीन हजार लोकसंख्येला अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी विद्युत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून ही समस्या सोडविण्यासाठी अनेक हेलपाटे मारले आहेत. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदिवासी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

फोटो: उषा पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज