अ‍ॅपशहर

दृष्टिहीन कुटुंबांना धान्यवाटप

करोना महामारीच्या काळात वैद्यकीय, स्वच्छताकर्मी, प्रशासन इ. अनेक सेवाभावी समाजघटक आपापल्यापरीने या संकटाशी मुकाबला करत आहेत. रोटरीसारख्या सेवाभावी संस्थाही या सेवेत आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 27 Jul 2020, 4:55 pm
म. टा. वृत्तसेवा, कल्याण :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grains


करोना महामारीच्या काळात वैद्यकीय, स्वच्छताकर्मी, प्रशासन इ. अनेक सेवाभावी समाजघटक आपापल्यापरीने या संकटाशी मुकाबला करत आहेत. रोटरीसारख्या सेवाभावी संस्थाही या सेवेत आघाडीवर आहेत. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमकडून मागील तीन महिने अनेक गरीब कुटुंबांसाठी किराणा-पाकिटे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हॅन्डग्लोव्हज पुरवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेत आहे. अंध कुटुंबांना किराणा सामानाची गरज असल्याचे कळताच त्यांना अन्नधान्य पुरवून त्यांची गरज भागवावी, अशा विचारातून रविवार २६ जुलैला दुपारी एमआयडीसी परिसरात अंध व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना धान्य-पाकिटाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख मंदार कुलकर्णी असून याप्रसंगी संस्थापक सदस्य डॉ. प्रल्हाद देशपांडे, इनरव्हील अध्यक्ष ज्योती दाते, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी श्रीपाद कुलकर्णी आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज