वाडा : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वाडा तालुक्याच्या वतीने शहरातील खंडेश्वरीनाका येथे शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करून पर्यावरणरक्षणाचा संदेश देण्यात आला. ५०० फळझाडांचे वाटप करण्यात आले असून यामध्ये फणस, आंबा, पेरू, सीताफळ, जांभूळ व अन्य फळझाडांचा समावेश होता. २१ जूनला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांनी सांगितले.
फळझाडे वाटप
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वाडा तालुक्याच्या वतीने शहरातील खंडेश्वरीनाका येथे शेतकऱ्यांना फळझाडे ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2020, 4:00 am