अ‍ॅपशहर

दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांचे आंदोलन

दिवा-रोहा पॅसेंजर गाडी उशिरा आल्याने दिवा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन सुरु केले आहे. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर गाडी उशिरा आल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरु केले. या प्रवाशांनी कल्याण लोकल गाडी रोखली.

Maharashtra Times 11 Jan 2017, 10:57 pm
दिवा-रोहा पॅसेंजर गाडी उशिरा आल्याने दिवा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर गाडी उशिरा आल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरु केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diva railway station protest
दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांचे आंदोलन


दिवा-रोहा पॅसेंजर गाडी रोज उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होतात. तीन तासांच्या प्रवासात या गाडीत शौचालयाची देखील सोय नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रुळावर उतरून अर्धा तास कल्याणकडे जाणारी लोकल रोखून धरली होती. त्यानंतर आरपीएफने हस्तक्षेप करून आंदोलकांना हवटले.

त्यानंतर दिवा-रोहा पॅसेंजर ही ८ वाजता येणारी गाडी एक तास उशीराने दिवा स्थानकात पोहोचली. कामन रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाडी उशिरा आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही गाडी ९ वाजून १५ मिनिटांनी रोह्याकडे रवाना झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज