अ‍ॅपशहर

भंगाराच्या गोदामांकडे दुर्लक्ष का?

मनोर-वाडा-भिवंडी या राष्ट्रीय महार्गावर वाडा तालुक्यातील पाली येथे भंगाराची अनेक गोदामे आहेत. मात्र या गोदमांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे.

Maharashtra Times 6 Feb 2018, 8:50 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do we ignore the storage godowns
भंगाराच्या गोदामांकडे दुर्लक्ष का?


मनोर-वाडा-भिवंडी या राष्ट्रीय महार्गावर वाडा तालुक्यातील पाली येथे भंगाराची अनेक गोदामे आहेत. मात्र या गोदमांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे या गोदामांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

वाडा-मनोर-भिवंडी महामार्गावरवरील पाली येथील रस्त्यावरच भंगारमाफीयांनी थाटलेल्या या गोदामांमुळे भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

वाडा-मनोर महामार्ग तसेच वाडा-विक्रमगड-जव्हार मार्गावरील पाली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. हा रहदारीचा भाग असल्याने इथे सतत वर्दळ असते. येथे मोठ्या प्रमाणात भंगार गोळा करणारी वस्ती महामार्गानजीक निर्माण झाली आहे. हे भंगारवाले आजूबाजूच्या खेड्या-पांड्यातील भंगार गोळा करून पाली येथे आणतात. मात्र हे सर्व भंगार वाडा-मनोर माहामार्गावरच साठवले जाते. भंगार गोळा करणाऱ्या गाड्यासुद्धा रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे येथे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

वाडा-मनोर महामार्गावर असलेल्या पाली या ठिकाणी परप्रांतीय भंगारवाल्यांनी भंगाराची अनधिकृत गोदामे थाटल्याने भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी तातडीने लक्ष देऊन ही भंगाराची दुकाने हटवावीत.

सिद्धार्थ सांबरे, कार्याध्यक्ष, युवा स्पर्श सामाजिक संस्था

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज