अ‍ॅपशहर

कारवाईत डॉलीची अरेरावी

येथील प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेले साईबाबा मंदिर हटविण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण झाले होते. या मंदिरावर कारवाई होऊ नये म्हणून काही स्थानिक नागरिकांनी बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रा यांना बोलविले होते. डॉलीने कारवाईस विरोध करत अरेरावी केली.. मात्र मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने याला न जुमानता शुक्रवारी साई बाबा मंदिर जमीनदोस्त केले.

Maharashtra Times 31 Dec 2016, 3:00 am
उल्हासनगर : येथील प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस असलेले साईबाबा मंदिर हटविण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण झाले होते. या मंदिरावर कारवाई होऊ नये म्हणून काही स्थानिक नागरिकांनी बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रा यांना बोलविले होते. डॉलीने कारवाईस विरोध करत अरेरावी केली.. मात्र मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने याला न जुमानता शुक्रवारी साई बाबा मंदिर जमीनदोस्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dolly bindra opposed to action of holly place in ulhasnagar
कारवाईत डॉलीची अरेरावी


उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर २९ सप्टेंबर २००९ रोजी पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात २६३ धार्मिकस्थळे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी वाहतुकीला अडथळा निर्माण

करणारी १५पेक्षा अधिक धार्मिकस्थळे पालिकेने जमिनदोस्त केली. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या अतिक्रमण पथक व पोलिस संरक्षणात प्रथम साईबाबा मंदिरावर कारवाई चालू असताना डॉली बिंद्रा व काही स्थनिक नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तुमची तक्रार करेन, अशी धमकी डॉलीने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज